मंगेश खराटे या माझ्या संकेतस्थळावर आपले स्वागत!

नमस्कार,
फेब्रुवारी २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढण्यास सदैव तत्पर असलेल्या माझ्या सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या निवडणूकीत आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. माझा राजकीय प्रवास या संकेतस्थळाच्या माध्यमातुन आपल्या समोर थोडक्यात मांडत आहे. माझ्या या कार्याच्या आधारे येणा-या महानगरपालिकेच्या निवडणूकीत आपण मला मतदानरूपी आशीर्वाद देऊन उपकृत कराल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद !

अल्प परिचय

मतदार नागरिक बंधू भगिनिंनो,

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या निवडणूकीचे बिगुल वाजले असुन आपण आपले बहुमूल्य मत देताना आपल्या मनात उमेदवाराबाबत काहीतरी कल्पना असणार आहेच. आपला प्रभाग हा तसा उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत मतदारांनी परिपूर्ण असा प्रभाग आहे. तेव्हा आपल्या प्रभागाचा लोकप्रतिनिधी हा कल्पनाशक्तीचा तसेच कामाचा विलक्षण सपाटा असणारा, उत्साही तसेच एखादा घेतलेला ध्यास दिमाखदार, नाविन्यपूर्ण व सर्वांना सामावून घेत साकारणा-या क्षमतेचा असला पाहिजे.

मी आजपर्यंत आपल्या प्रभागातील अडीअडचणींबाबत माझ्या यथाशक्ती प्रमाणे कायम जागरुक राहिलेलो आहे. या कामात मला अनेक नागरिक, मित्रमंडळी, स्नेही, विविध राजकिय पक्षांच्या व्यक्ती यांनी सहकार्य केले आहे. त्या सर्वांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो.

आपण किती काम केले याही पेक्षा आपल्याला अजून किती काम करावयाचे आहे हे मी नेहमीच पहात असतो. नागरिकांची कामे करताना संबधीत व्यक्ती आपल्या पक्षाचा आहे का, आपल्या विचारांचा आहे का हे न पहाता तसेच त्याची जात-पात-धर्म न पहाता ती व्यक्ती आज आपणांकडून मदतीची अपेक्षा करीत आहे व आपण त्यास आपल्या यथाशक्तीने मदत करुन त्याची अडचण सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हे मी माझे प्रथम कर्तव्य समजतो.

माझे कार्यक्षेत्र असलेल्या या प्रभागातील नागरिकांना आवश्यक असणा-या नागरी सुविधांबरोबरच शासन निधीतून करावयाची विविध विकास कामे तसेच समूहांचे धोरणात्मक विषय ह्या सर्व बाबतीत मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि तो यापुढेही करत राहीन. माझ्या या प्रयत्नांमध्ये आपली साथ मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद !

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७

प्रभाग क्र. १३ एरंडवणे-हॅपी कॉलनी - (ड गट) सर्वसाधारण खुला

नाव :
खराटे मंगेश रोहिदास
वय :
४३ वर्ष
शिक्षण :
बी. कॉम., डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कॉम्प्यूटर अॅप्लीकेशन, डिप्लोमा इन कॉम्प्यूटर इन्फॉर्मेशन सिस्टिम.
व्यवसाय :
प्रिंटींग / डी. टी. पी, Pick-N-Go(खिमा-पाव सेंटर)
चिन्ह :

सामाजीक कार्य

उल्लेखनीय कार्य

पानशेत पूरग्रस्तांचे सन १९६१ पासुन प्रलंबीत राहीलेले प्रश्न गेली १७ वर्ष अथक व अभ्यासपूर्ण परिश्रम करुन सोडविण्यात यशस्वी.

इतर कार्य / कामे

एड्स रोगाबद्दल जनजागृती मोहीम.
अंध मुली-मुलांना ब्रेल लिपीच्या पाट्या व खेळणी वाटप.
महापालिकेच्या शाळेत लहान मुला-मुलींना खाऊ वाटप.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप.
नागरिकांना विज कनेक्शन व शिधापत्रिका मिळवून देणे.
राष्ट्रीय आपत्तीकाळात मदतनिधी गोळा करण्यात सहभाग.
गरीब व आजारी रुग्णांना विविध संस्था व राज्य सरकारकडून मदतनिधी.
गरीब व गरजू महिलांना साडी वाटप.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ प्रभाग क्र. १३ एरंडवणे-हॅपी कॉलनी - (ड गट) सर्वसाधारण खुला

पानशेत पूरग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी केलेला पत्रव्यवहार, बैठका, पाठपुरावा आणि शासनाकडून करवून घेतलेले निर्णय यांचा लेखाजोखा असलेले
कहाणी पानशेत पूरग्रस्तांची (निश्चयाची, हक्कांची आणि संयमी लढ्याची) या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची काही क्षणचित्रे.
माझी आता पर्यंतची वेगवेगळी कार्ये.

संपर्क

मंगेश रोहिदास खराटे

३९/५७, गणेशनगर, ओटा वसाहत, गांधी लॉन्स जवळ, पुणे - ३८

दूरध्वनी : ९८२३१४३०४७

mangeshkharate1973@gmail.com